Posts

Showing posts from June, 2022
Image
  ब्रह्मतल - एक अविस्मरणीय ट्रेक पर्वतप्रेमी सर्व जनतेला खरं तर प्रत्येक ट्रेक हा अविस्मरणीयच , परंतु माझा हा ट्रेक का अविस्मरणीय हे तुम्हाला कळेलच . ट्रेक की anniversary अशा अदभुत प्रश्नामधून ( anniversary नाही हा फक्त पहिली anniversary ) सुरु झालेला हा ट्रेक पूर्ण होईल याची शाश्वती खरं तर ब्रह्मदेवालाही नसावी , भले त्याच्या नावाचा ट्रेक आहे तरी. परंतु माझी अर्धांगिनी ऋतुजा जिच्या संपूर्ण पाठबळावर हा ट्रेक मी खरं तर पूर्ण करू शकलो. हिमालयीन ट्रेक हा एक उत्सवच जणू. Rucksack च्या खरेदीपासून अगदी extra न्यायच्या thermal पर्यंत प्रत्येक shopping ला ऋतुजानेच मदत केली. खरं तर जाण्याचा पहिला दिवस आणि माझ्या ( sorry हं आमच्या) लग्नाची पहिली anniversary हा एकच दिवस. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असा निरोप तिने मला दिला. आमच्या पहिल्या anniversary ला ' दोन ध्रुवावर दोघे आपण ' च्या तऱ्हेने मी दिल्ली आणि ऋतु मुंबईच्या दिशेने निघालो. आता सुरू होते खरी ट्रेकची मजा . सकाळचं 9.30 चं माझं flight prepone काय होतं आणि अगदीच miss व्हायच्या बेतात मी शेवटचा प्रवासी म्हणून काय ज...